१९६० ते साधारणत: १९७० पर्यंतचा पुण्यातील काळ, रांगोळ्यांसाठी सुवर्ण काळ होता. मी त्या काळात अनेक रांगोळी प्रदर्शनातून भाग घेत असे. आमचा एक ग्रुपच होता. आताचे प्रसिध्द चित्रकार श्रीयुत सुहास बहुलकर हे त्या काळात शाळेत शिकत असत व आमच्या ग्रुप मधील सर्वात छोटे पण महान चित्रकार असत.