१)माझ्या बद्दलची माहिती देतांना माझ्या ब्लॉग्स बद्दल माहिती देणे अत्यावश्यकच ठरणार आहे. मी ब्लॉग कसा व केव्हा सुरू केला ह्या बाबत तितकेसे आता आठवत नाही पण तेव्हा मी गुगलच्या ऑर्कुटवर पडिक असायचो. तिथे तेव्हा कवितांना बहर आला होता माझ्या तेथील मित्र मैत्रीणींच्या नादाने मी ही यमकं जुळवायला लागलो होतो ! मला वाटते गुगलनेही त्याच सुमारास ब्लॉगस्पॉट ताब्यात घेतले होते.व ब्लॉग्स बद्दलच्या जाहिराती नेटवरून सुरू झालेल्या पहाण्यात आलेल्या होत्या. मी ही मग माझा एक ब्लॉग बनवून टाकला. अर्थात त्यावर काही पोस्ट वगैरे टाकायच्या असतात इत्यादि मला काहीच ठावुक नव्हते. हा माझा ब्लॉगही कित्येक दिवस तसाच पडिक होता. माझ्या एका मैत्रीणी कडे जेव्हा तिच्या कविता ब्लॉगवर टाकलेल्या पाहील्यात तेव्हा मग मी माझ्या कविता सुध्दा माझ्या ह्या ब्लॉग वर टाकू लागलो. तो पर्यंत ऑर्कुट वरच माझ्या कवितांसाठी एक फोरम तयार केलेला होता. हा माझ्या कवितांचा एकुलता एक ब्लॉग. इथे टिचकी मारली की तो उघडेल!
२) त्यानंतर अजून दुसरा ब्लॉग बनविला तो रेखा चित्रांसाठी. माझी एक नेट वरील मैत्रीण कॅनडा मध्ये होती. माझ्या चित्रांवर आवर्जून कॉमेंट्स द्यायची, चर्चाही करायची. तिच्या साठी मी हा ब्लॉग बनविला. अपेक्षा होती की त्यावर नेहमी चित्रे व चर्चा चालू रहातील. पण तसे काही घडले नाही. अलिकडे माझा त्यावरील वावर कमी झालाय. इथे टिचकी मारलीत तर तो उघडेलही.
३) तिसर्या ब्लॉगची मजा काही औरच! माझी ओळख मस्कतच्या तन्वी शी झाली ती मंडळी सर्व वर्डप्रेस वरील ब्लॉगवर असायची. मग मीही त्या वर एक ब्लॉग सुरू केला. त्यावर साठ च्या वर पोस्ट टाकल्या होत्या मी. पुण्यात १७ जानेवारी २०१० रोजी पु.ल. देशपांडे उद्यानात, मराठी ब्लॉगर्सचा पहिला वहिला मेळावा, मी व माझ्या पाच सहकार्यांनी मिळून घडवून आणला होता. ज्याची दखल पुढे मराठी साहित्य परिषद व मेडीयानेही घेतली होती. सगळ्या महाराष्ट्रातून साठच्या वर प्रतिनिधी त्याला हजर झाले होते. ह्याची साद्यंत माहीती ह्या ब्लॉगवर वाचायला मिळेल.
माझ्या ह्या ब्लॉगचे नाव आहे “ येss रे मना येरेss मना “. वाचायचा असेल तर मारा टिचकी इथे !