माझी वेब साईट बनवून फार दिवस झाले नाही तोच मला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे, व मला त्यात खुशी आहे.
गेले कित्येक महिने स्वत:ची वेब साईट असावी ह्या विचाराने पछाडलो गेलो होतो. इंटरनेट वरील व इतर ठिकाणा हून त्या संबंधी मिळेल तशी माहिती मिळविणे तसेच माहितगार लोकांकडून माहिती गोळा करणे चालू होतेच.
सहजच एका मित्राची वेब साईट पहाण्यात आली. ती साईट त्याने www. weebly.com ह्यांच्या मदतीने केलेली होती. मग मी ही त्या साईट वर जावुन मागोवा घेतला मला ती खुप आवडली. त्यात दिलेल्या सुचना, नमुने आणि ट्युटोरिअल्स अप्रतीम आहेत. माझ्या सारख्या कॉम्प्युटर अडाण्यालाही डोळ्या समोर ठेवून सर्व काही बनवले आहे व म्हणुनच ते सोप्पे वाटले-आहे. शिवाय आपल्या कॉमेंटस ह्या वेबसाईटला सुधारण्याच्या मार्गातील मार्गदर्शक मैलाचे दगड असणार आहेत. |
Authorमाझे नाव आहे सुरेश पेठे. मी सिव्हील इंजीनियर होतो. रिटायर्ड झाल्यावर चित्रकला विषया्च्या आधीच्या आवडीचे रुपांतर छंदात केले. आता पुण्यात स्थायिक झालो आहे. ArchivesCategories |