१
माझ्या बद्दल काय लिहायचं ? विचार करत बसलो की अनेक प्रसंग डोळ्यांपुढे उभे रहातात. माझे मित्र श्रीयुत प्रमोद देव ह्यांची ओळखही मला फेसबुक नेच करून दिली होती. आधी किरकोळ चाटींग झाल्यावर मुंबईस मालाडला गेलो व प्रत्यक्षच ओळख झाली व वाढली. संगीताचे शौकीन, चाली लावण्यात माहीर. नेटवर अनेक विशेषांक काढीत. एका अंका साठी त्यांना माझी चित्रे हवी होती, पण शेवटी त्याचा लेखच तयार झाला तो काहीसा आत्मवृत्तपर असल्याने त्याचीच प्रथम लिंक देऊन सुरुवात करावी असे वाटले.
२
इंटरनेट वरील नेटीझन्स एकमेकांचे मित्र किंवा मैत्रीणी असतात ! इथे वयाचा संबंध नसतो म्हटले तरी चालेल , त्यामुळे आजोबा व नात हेही एकमेकांचे मित्र मैत्रीणीच असतात. हे एक अजब विश्व आहे. इथे एकमेकांना पाहिलेही नसले तरी त्यांची गाढ मैत्री असू शकते होऊ शकते भले ते जगाच्या पाठीवर कोठेही असोत ! ...तर कधी, असे झालेले मित्र वा मैत्रीणी इतकया जवळच्या निघु शकतात की कल्पनाही करवणार नाही !
तन्वी देवडे ,आधीची मस्कत व आता आबुधाबी येथे रहाणारी अशीच माझी एक येथलीच मैत्रीण, पुढे अधिक ओळख झाल्यावर कळले की ती माझ्या एका बाल मैत्रीणीची नात आहे. तिच्या आईला कधी लहानपणी मी खेळवलेलेही आहे ! तिने तिच्या ब्लॉगवर दिलेली माझी माहीती मुळातूनच का वाचत नाहीत ?
३
ही माझी मैत्रींण मुळची गौहत्तीची नाव कस्तुरी ( Kasturi Borkotoki ) आता पवई ला स्थायिक झालीय. तिच्या आडनावाचा उच्चार मला अजूनही करता आलेला नाही ! ती नेमकं काय करते हे तिला भेटेन तेव्हाच कळेल. मी मुंबईला गेलेलो होतो तेव्हा दोनदा तिला भेटायचा प्रयत्न केला पण जमलेलेच नाही. काही ब्लॉग्सचे सर्फींग करीत असतांना तिचा ब्लॉग नजरेत भरला तो तिने नाईफने ऑईल पेंटींग करण्या संबंधी काही टिप्स तिच्या ब्लॉग मधून दिल्या त्या वाचनात आल्या मुळे. ती बहुधा पवई येथून नेटवर निघणार्या एका नियतकालीके साठी लिखाण करते. माझी चित्रे तिला आवडली. मी ती सातत्याने फेसबुक वर “रोज एक चित्र “ स्वरुपात तेव्हा टाकीत असल्याने ती प्रभावित झाली होती व मला माहीती देण्यासाठी संमती विचारली व माझा होकार आल्यावर तिने मला एक प्रश्नावलीच पाठवून दिली. ती सर्व माहीती मुळातून वाचण्या साठी इथे टिचकी मारा.
४
वैशाली अय्या ही माझी नेट वरची मैत्रीण , तिलाही मी प्रत्यक्ष पाहीलेले नाहीच. मुळची नाशिकची पण ठाण्यात स्थिरावलेली. माझ्या गावातली असूनची माझ्या “गावची “नव्हती ! पण फेसबुक मुळेच गावली. अतीशय जिद्दी व चिकाटीने काम करणारी. कलेची आवड लहानपणापासूनच. फोटोग्राफीत माहीर. विशेषत: लहान मुलांच्या भावविश्वात जाऊन त्यांचे व्यक्तीमत्व फोटोत उतरवणे सोपे नाहीच ! वेब व ग्राफिक डिझायनर हा ही प्रांत कित्येक वर्षे उत्तम चोखाळते आहे. तिचे www.50splus.com हे संकेत स्थळ तिने खास बनवलंय, ते अश्या कलाकारां साठी जे पन्नाशी नंतर सुध्दा तितकेच तरुण राहून अधिक वेगळ्या पधदतीने आपले आयुष्य नव्या जोमाने सुरु करतात, त्याला नवा आकारही देतात. ह्या स्थळा साठी मला प्रश्नावली पाठवून माहीती मागवली होती तेव्हा प्रथम मला आश्चर्य वाटले. पण काय सुंदर मांडणी केलीय तिने, माझीच मला नव्याने ओळख झाल्या सारखी वाटली. ती समग्र माहीती मुळातून वाचण्या साठी इथे टिचकी मारा.
५
“ आर्टीस्ट ऑफ इंडिया “ ह्या नावाने एक ग्रुप ब्लॉग दिल्लीच्या आरती चौहान चालवतात. त्या स्वत: ही उत्तम चित्रकार आहेत. उभारत्या भारतीय चित्रकारांसाठी त्यांनी हा ग्रुप-ब्लॉग बनवला आहे . माझीही काहीच चित्रे त्यात आहेत. टिचकी माराच ती पहाण्या साठी.